*विनायक प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा*
दि.17 जुन -(बीड प्रतिनिधी) विनायक प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव घेण्यात आला,ढोल ताशे वाजवून लहान मुलांचे स्वागत करण्यात आले.प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते शाळेतील सर्व मुलामुलींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी प्रत्येक मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांचा उत्साह वाढवला, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलामुलींना मिठाई वाटप करून मोफत पुस्तके वाटप करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी शाळेचे वार्षिक नियोजन ,उपक्रम यांचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सुचना, मार्गदर्शन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये वृक्षारोपण केले व शाळेतील मुलांना वृक्षारोपनाचे महत्व समजावून सांगितले सर्वांनी एक झाड आपापल्या अंगणात लावावे असा मौलीक संदेश दिला.अशा प्रकारे शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात पार पडली.

No comments:
Post a Comment