Thursday, 21 February 2019

विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Vivekgavhane88@gmail.com*एक आदर्श राजे छत्रपती शिवराय-सौ.किर्तीताई पांगारकर*
बीड प्रतिनिधी-  शिवजयंती निमित्त विनायक प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याप्रसंगी प्रमुख पाहुणे अजिंक्य चांदणे सर, श्रीमती चौधरी सुनीता मॅडम, उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा,कार्याचा आढावा श्री.उत्तरेश्वर भारती सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. शाळेतील मुले शेख साद,आदर्श आरे, गुंजाळ कल्पना, रोहन गुंजाळ, इम्रान शेख, आनेराव आदिनाथ, अल्तमश सय्यद यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्यांची महती भाषणातून व्यक्त केली.शाळेचे शिक्षक श्री. वैजिनाथ गिराम सर,भारती क्षीरसागर मॅडम, प्रमुख खास वक्ते अजिंक्य चांदणे सर,श्री.तन्वीर पठाण सर,शिवलिंग क्षीरसागर,विवेक गव्हाणे सर,सुनीता चौधरी मॅडम,अशोक काशीद सर,बाळू काळे सर,दिलीप तकीक सर,शैलजा बावस्कर मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,गणेश भागडे सर,संजीवनी पवळ मॅडम,नईम पठाण सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.छत्रपती शिवराय हे एक आदर्श राजे ज्यांच्या पराक्रमाची अगाध महिमा आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. छत्रपती शिवराय हे महान राजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेऊन एक आदर्श हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार करून, एक महान राजे अजरामर आहेत. त्यांचे कार्य, आदर्श विचार, धर्मनिरपेक्षता, सामाजिक बांधिलकी खूप मोलाची आहे त्यांचे विचार आपण आत्मसात करून आपण कार्य केले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय भाषणांतून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी मनोगत व्यक्त केले.हा शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण फुलमाळी मामा,लक्ष्मण चव्हाण मामा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे खास सूत्रसंचालन श्री.विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती शारदा बहिरमल मॅडम यांनी मानले.




No comments:

Post a Comment