*विनायक प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
बीड(प्रतिनिधी)दि-२८ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते जागतिक नोबेल पुरस्कार प्राप्त चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रमुख पाहुणे शेषेराव वाघमारे सर,भारती क्षीरसागर मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेतील शिक्षक श्री.शेषेराव वाघमारे सर,उत्तरेश्वर भारती सर, दिलीप तकीक सर,बाळू काळे सर,शिवलिंग क्षीरसागर सर, वैजिनाथ गिराम सर,अजीजराजा शेख सर,अनिल लेहणे सर,विवेक गव्हाणे सर,नईम पठाण सर,शैलजा बावस्कर मॅडम,शहेबाज शेख सर,सिमा उदगीरकर मॅडम,मनीषा चौधरी मॅडम,अशोक काशीद सर,वर्षा म्हेत्रे मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,अमोल पाटोळे सर,गणेश भागडे,यांनी विज्ञान दिनाचे महत्व लक्षात घेऊन विविध विज्ञान प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील मुलांनी पण आपापले प्रयोग सादर करून आपल्या शोधक,कल्पक वृत्तीचे दर्शन घडवले.भारताच्या विकासाच्या इतिहासात भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान युगात भारतीय वैज्ञानिकांचे मोलाचे योगदान आहे.भारत आज जगाच्या नकाशावर एक अग्रभागी, बलशाली असणारा देश ओळखला जातो आहे.भारताच्या संरक्षण व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताचे महान वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकट रामन, डॉ,ए.पि.जे.अब्दुल कलाम सारख्या अनेक लोकांनी देशाच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असे योगदान दिले आहे. चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या अलौकिक शोध निबंधास जागतिक नोबेल पुरस्कार मिळाला ही आपल्या भारताच्या इतिहासातील अभिमानाची अशी गोष्ट आहे म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आपण राष्ट्रीय विज्ञान दिन हा प्रत्येक वर्षी साजरा करून त्यांच्या कार्याला सन्मान देतो असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाचे महत्व विशद करून वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन आपण नवनवीन शोधक वृत्तीने, विज्ञान क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे असे महत्वपूर्ण मार्गदर्शन करून छोट्या छोट्या मुलांनी विज्ञान दिनानिमित्त केलेल्या विज्ञान प्रात्यक्षिकांचे कौतुक केले.शाळेतील विज्ञान प्रदर्शनात विविध मुला मुलींनी सहभाग घेतला व आपापल्या प्रयोगाची सखोल माहिती उपस्थित मान्यवरांना करून दिली.
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण फुलमाळी, लक्ष्मण चव्हाण मामा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन तन्वीर पठाण सरांनी केले तर आभार सुनीता चौधरी मॅडम यांनी मानले.