*विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर*...
दि-१८ डिसेंबर(बीड प्रतिनिधी)-जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा 'यशवंतराव
होळकर' आदर्श शिक्षिका पुरस्कार विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांना जाहीर झाला आहे. बीड शहरातील पेठ बीड भागातील विनायक प्राथमिक शाळेच्या माध्यमातून गरीब,वंचीत मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्व. लोकनेत्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी सोय केली आहे,हाच उद्देश,ध्येय पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर कार्य करत आहेत.शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून त्या परिचित आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव वेगवेगळी कल्पक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे तत्परतेने त्यांचे प्रयत्न असतात.सकारात्मक विचारांची शिकवण विदयार्थ्यांना देण्यासाठी बालसंस्कारयुक्त मार्गदर्शन नेहमीच आपल्या मौलिक विचारांतून व्यक्त करत असतात.शाळेचं यश हे शिक्षकांवर अवलंबून असते त्यासाठी शिक्षकांना वेळोवेळी आपल्या अनुभव संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहतात.शाळेतील मुलांना मोफत शालेय गणवेश,शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके,शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी सदैव तत्पर राहतात.विविध शैक्षणिक उपक्रम राबवून ज्ञानार्जनाचे पवित्र काम करण्यासाठी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीच प्रयोगशील राहतात.शाळेतील प्रत्येक मुला मुलींच्या प्रगतीसाठी विविधांगी सहशालेय कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून बौद्धिक,कला,क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून चालना,प्रेरणा देत असतात.शाळेबरोबर विविध सामाजिक कामात त्या अग्रेसर असतात.अध्यापनामध्ये संस्कारमय, सहज,अभ्यासाची गोडी लावून ती साकारण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणारे अथक प्रयत्न ही सौ.किर्तीताईंच्या कार्याची खरी ओळख आहे.हेच शैक्षणिक कर्तव्याचे साधन यशाचे गमक आहे म्हणून नवनवीन संकल्पना राबवून आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम त्या करत असतात.शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी विविध शिबिरे आयोजित करून मोफत औषधी व साहित्य उपलब्ध करून देतात.विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना संस्कारीत आदर्श व्यक्तिमत्व बनवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.सातत्यपूर्ण विविध शैक्षणिक कार्यक्रमांच आयोजन शाळेमध्ये राबवत असतात.किर्तीताईंच्या या सर्व विविधांगी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन,त्यांचे हे कार्य मार्गदर्शक,प्रेरणादायी आहे,एक आदर्श आहे त्यांचा गौरव म्हणून जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठानने "यशवंतराव होळकर"मानाचा आदर्श शिक्षिका म्हणून सौ.किर्तीताई पांगारकर यांची या महत्वपूर्ण पुरस्कारासाठी निवड केली आहे.