Monday, 15 October 2018

15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम

*वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत जाते, "वाचाल तर वाचाल"!..सौ.किर्तीताई पांगारकर*

दि-15 ऑक्टोबर या दिवशी विनायक प्राथमिक शाळा पेठ, बीड या शाळेत डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने वाचन-प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर प्रमुख पाहुणे श्रीमती बहिरमल मॅडम, चौधरी मॅडम, पवळ मॅडम, देशमुख मॅडम यांनी भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पि.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती, वाचन प्रेरणा दिनाचे महत्व श्री.गव्हाणे सरांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम हे गरीब कुटुंबातील एक मुलगा परिस्थितीतुन पुढे येऊन शिक्षण घेऊन भारताच्या इतिहासात एक अजरामर व्यक्ती होऊन गेले असे आपल्या खास शैलीत तन्वीर पठाण सरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाचे महत्व पटवून दिले. खडतर आयुष्यातून त्यांचे पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन झाले असे श्रीमती चौधरी मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून वाचनाचे फायदे सांगितले. शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. जो शिकेल तो वाचेल, वाचाल तर वाचाल, डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांना वाचनाची गोडी, छंद होता म्हणून आपल्या देशाचे वैज्ञानिक झाले, भारताच्या संरक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान खूप महत्वाचे होते. डॉ. कलाम यांचे कार्य खूप महान होते, आयुष्याच्या शेवटपर्यंत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिले,वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत असते, डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांचे जीवन,आदर्श नक्कीच आपल्याला एक आदर्श देऊन जाते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले.. त्यांनतर मुलांना त्यांनी काही पुस्तके वाचण्यासाठी भेट दिली
  वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
  कार्यक्रमाचे खास सूत्रसंचालन श्री. भागडे सरांनी केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले.



Wednesday, 10 October 2018

सौ. किर्तीताई पांगारकर या स्व. गोविंदराव मचाले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी आदरभाव ...

*आमचे स्फूर्तिस्थान आधारवड आदरणीय स्व. गोविंदराव मचाले मामा यांच्या आठवणीने खूप गहिवरून येतेय.. तुमचे शैक्षणिक व सामाजिक काम खूप मोठे होते...क्षीरसागर व मचाले परिवारातील एक मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून मामा परिचित होते.. स्वभाव जरी वरून कडक वाटला तरी आतून प्रेमळ व शांत स्वभावाचे मामा होते..आयुष्याच्या शेवटपणे तुम्ही सतत आपल्या आदर्श शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही सतत विद्यार्थी व शिक्षकांना व आम्हांला मार्गदर्शन करत होतात, अनेकांना तुम्ही खूप मदत केली स्व. काकूंच्या पाठीमागे भाऊ म्हणून खंभीर साथ तुम्ही दिली.. आपले हे अमूल्य कार्य आम्हाला सतत प्रेरणा देत जाईल.. तुम्ही चाललेल्या मार्गाने आम्ही पुढे चालू .. आजही जेंव्हा मी संस्थेच्या परिसरात जाते तेंव्हा तुमची खूप आठवण येते तुम्ही ऑफिस मध्ये आहेत असं वाटतं.. आजही तुमची उणीव आम्हांला नेहमी जाणवते..तुमचं अतुलनीय , कुशल मार्गदर्शन,विचार आमच्या साठी लाख मोलाचे असतील..सदैव तुम्ही माझ्या कायम स्मरणात राहाल, तुमचे आदर्श विचार आम्ही जपू..ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.. तुमच्या प्रेमळ, अतुलनीय शैक्षणिक कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करते... आजही तुम्ही आमच्यात आहात.. तुमच्या पावन स्मृतिस भावपूर्ण विनम्र अभिवादन*..💐💐💐
        -----🖋सौ. किर्ती पांगारकर/साळुंके

स्व. केशरकाकू क्षीरसागर पुण्यतिथी कार्यक्रम

*स्व.केशरकाकू क्षीरसागर एक अनमोल व्यक्तीमत्व...सौ. किर्तीताई पांगारकर*
   दि.4 ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.बीड जिल्ह्याच्या माजी खा. केशरकाकू क्षीरसागर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रमुख शिक्षक यांच्या हस्ते स्व.केशरकाकू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.. प्रथम माजी खासदार स्व. केशरकाकू यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री.भागडे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.गिराम सर, श्री.भारती सर, श्री.पठाण सर ,श्री गव्हाणे सर श्रीमती चौधरी मॅडम, बहिरमल मॅडम यांनी स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर सादर केला, स्व. काकूंच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली त्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जडणघडणीत स्व .काकूंचा मोलाचा वाटा होता. आयुष्यभर त्या संघर्ष करत सामाजिक व राजकीय स्वतंत्र अस्तित्व त्यांनी आपले दाखवून दिले. गोरगरिबांची मुलं शाळेत शिकावी यासाठी त्यांनी खेडोपाड्यात शाळा सुरू केल्या आज हे शैक्षणिक जाळ खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. काकू नेहमी आपल्या शाळेतील अडचणी, प्रगती याबद्दल नेहमी विचारणा करायच्या.बीड जिल्ह्याच्या घराघरात काकू पोहचल्या होत्या. राजकीय, सामाजिक कार्यातून आपल्या स्वकर्तव्याने त्यांनी विविध संस्था, कारखाना, सूतगिरणी उभा केल्या यामागे काकूंचा दूरगामी विचार होता. स्व. केशरकाकू क्षीरसागर हे एक अनमोल व्यक्तिमत्त्व होते.त्यांचे कार्य खूप महान होते.आज काकूंची 12 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी काकूंच्या आठवणींना उजाळा दिला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गव्हाणे सरांनी केले तर आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले..

Tuesday, 2 October 2018

रंगभरण स्पर्धेत ताईंची उपस्थिती

आपल्या शाळेच्या या संकुलामध्ये आपण वेगवेगळे उपयोजनात्मक उपक्रम आपण राबवतो त्या पाठीमागे आपला हेतू फक्त आपल्या शाळेतील विद्यार्थी कुठंतरी पुढे आले पाहिजे त्यांच्या मध्ये असणाऱ्या कलागुणांना कुठंतरी संधी आपण पुढे उपलब्ध करून दिली तर नक्कीच ही मुले पुढे येऊन आपली कौशल्य दाखवतील म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदरणीय मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या कल्पनेतून साकारलेली ही रंगभरण स्पर्धा खूपच चांगल्या प्रकारे पार पडली यामध्ये सौ. किर्तीताई पांगारकर या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चित्राला देणाऱ्या रंगाचे परीक्षण करून या लहान मुलांच्या आनंददायी या स्पर्धेमध्ये त्याही सहभागी होऊन आपल्या अंगी हातात असणाऱ्या रंगाच्या सुबक छटाना रंग देऊन या लहान लहान मुलांमध्ये बसून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये समरस झाल्या होत्या. विद्यार्थ्यांप्रति असणारी किर्तीताई यांची तळमळ,आपुलकी पाहून सर्व शिक्षक शिक्षिकाही या रंगभरण स्पर्धेमध्ये आनंदाने सहभागी होऊन या लहान मुलांच्या  रंगभरण स्पर्धेचा आनंद सर्वांनी मिळून द्विगुणित केला...

गणेशोत्सव रंगभरण स्पर्धा कार्यक्रम

*गणेशोत्सवा निमित्त रंगभरण स्पर्धा व क्रीडास्पर्धा संपन्न*..

दि-24/09/2018 बीड--विनायक प्राथमिक शाळेत गणेशोत्सवा निमित्त विविध शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई यांच्या हस्ते गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.. या संपूर्ण स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व लहान मुलां- मुलींनी सहभाग घेतला. आपल्या सुंदर कल्पनेने मनमोहक रंग गणरायाच्या चित्रात देण्यासाठी तल्लीन होऊन प्रत्यक्ष गणपतीचे हुबेहूब रंगछटा चित्रास देऊन आपले कौशल्य दाखवत होती या रंगभरण स्पर्धेचे परीक्षण आदरणीय मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,श्री.भारती सर,जमाले सर,गिराम सर,पठाण तन्वीर सर,गव्हाणे सर, भागडे सर, चौधरी मॅडम, पवळ मॅडम, बहिरमल मॅडम यांनी केले.या रंगभरण स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सौ. किर्तीताई यांनी सुद्धा या रंगभरण स्पर्धेत स्वतः भाग घेऊन गणरायाच्या प्रतिमेस आपल्या कल्पक, रंगानी रंग दिला. अशाप्रकारे हा अतिशय आगळावेगळा उपक्रम विनायक प्राथमिक शाळेत राबवून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंगी असलेले कल्पक उपजत गुण यांना संधी उपलब्ध करून हा शालेय उपक्रम कार्यक्रम स्पर्धा खूप उत्साहात संपन्न झाला...

अभिनंदन व शुभेच्छा पठाण तन्वीर सरांना

शिक्षण या पवित्र क्षेत्रात काम करत असताना कळत नकळत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारे शिक्षक खूप महत्वाचे असतात..शिक्षक म्हटलं की अंगात भीती वाटत असायची आज आनंददायी शिक्षणाबरोबर ज्ञानरचनावाद व मनोरंजनातून शिक्षण द्यावे लागते त्या भूमिका त्या कल्पना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उतरवण्यासाठी शिक्षकाचे कौशल्य खूप महत्वाचे असते .असेच विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथील शिक्षक त्यांच्या कामाचे कौतुक करावे ते थोडे होईल.अंगामध्ये असणाऱ्या उपजत कलांना ओळखून त्या प्रत्यक्षपणे अनुभवातून प्रगट करून दगडाला आकार देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा शिक्षक खूपच महत्वाचा आहे.परिस्थिती कशीही असुद्या पण सक्षमपणे पेलवण्याची टाकत ठेवतो तो शिक्षक खूपच महत्वाचा वाटतो.
     आमच्या शाळेतील पठाण तन्वीर सर हे एक अनमोल रसायन आहे.विविध प्रकारच्या कला गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या आपल्या शिक्षक सहकाऱ्यांचे कौतुक करावे ते थोडे असेल..अंगी , मनी एकच ब्रीद व तळमळ लक्षात घेता त्याप्रमाणे हसत खेळत विद्यार्थी हे आपले दैवत समजून पूर्णपणे त्यामध्ये झोकून देणारा व्यक्ती आम्ही जवळून बघितलाय.
 अशा या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या कार्याची नोंद घेऊन वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण असणारे व्यक्तिमत्व खूप उजळावे, हर्षावे, उंच उडावे म्हणून सतत कलात्मक प्रयोग करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या क्षेत्रामधून सामाजिक ,शैक्षणिक योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या यशातील बक्षीस असते.
    तन्वीर पठाण सर एक हुशार व हजरजबाबी माणूस खूप महत्वाचा आहे त्यांना वेगवेगळया सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार आणखी बळ वाढवणारे असते. तन्वीर पठाण सरांना आपल्या अल्पावधीच्या कालावधीतून मिळालेले पुरस्कार हे यशाचे लाखमोलाचे आहेत.सतत विद्यार्थी व तन्वीर पठाण सर हे आपल्या कामावर  मन लावून लहान होऊन आनंद घेत असतात.
    या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अत्यंत प्रभावीपणे आपल्या कौशल्याने आत्मविश्वासाने समरस होऊन विद्यार्थी दैवताच्या पूजनेसाठी नवनवीन सहशालेय उपक्रमाची व अभ्यासाची गोडी लावणारा अवलिया खूपच प्रेरणादायी असतो.
   तन्वीर पठाण सरांच्या या अनमोल योगदानाबद्दल त्यांचे संपूर्ण जीवनप्रवास शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही .अनेक व्यक्तीच्या नावाने दिले जाणारे आदर्श पुरस्काराचे मानकरी आम्हां सोबती लाभले याचा सार्थ अभिमान आम्हांस वाटतो.
  त्यांची प्रेरणा, मार्ग, दिशा  ही समर्थपणे चालवण्यासाठी आम्हांस ती प्रेरक ,दिशादर्शक ठरेल यांचा आम्हाला हेवा वाटतो म्हणून त्यांच्या शैक्षणिक कार्यांचा हा लेखाजोखा याचे बक्षीस म्हणजे त्यांना मिळालेले विविध आदर्श शिक्षक पुरस्कार हे त्यांचे भाग्य कर्म यांचे यथार्थपणे स्वीकारलेले अंगीकृत असे बक्षीस वाटते...
    त्यांच्या या आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानांकन दिलेल्याव त्यांना निवडलेल्या विविध प्रतिष्ठानचे कौतुक करावे ते थोडे असेल..
अशा हुरहुन्नरी व हसमुख व्यक्तित्वास पुढील शैक्षणिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!
   
                   🖋 श्री विवेक गव्हाने सर

पुरस्कार अभिष्टचिंतन, पठाण तन्वीर सर

श्री. पठाण तनवीर बाबासाहेब
 आदर्श  शिक्षण संस्था,बीड विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड  येथे गेल्या 13 वर्षापासून सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे.     ही शाळा स्व.खा. केशरकाकू क्षीरसागर यांनी लावलेलं रोपटे तिचा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आ. जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या आशीर्वादाने या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही शाळा प्रगतीपथावर आहे या शाळेत पेठ भागातील गरीब कुटुंबातील मुलं मुली शिक्षण घेत आहे या मुलांचे आई वडील मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात त्याशिवाय त्यांच्या घरातील चूल पेटत नाही हे शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांना  माहिती आहे म्हणून मुख्याध्यपिका किर्तीताई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत, शाळेत आली पाहिजे त्यांची जी काही अडचणी असतील त्या आपण सोडवू त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करू हे एक अवघड होते पण हे काम शाळेतील शिक्षक  पठाण तन्वीर बाबासाहेब यांनी  विविध स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या सर्व मुलांना शालेय साहित्य मिळवुन दिले
   शाळेत कार्यरत झाल्या पासून
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड ,सतत पालक संपर्क करून मा मुख्यध्यापिका कीर्ती ताई पांगारकर याचा मार्गदर्शनाने व सहकार्याच्या मदतीने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवली.वृक्षारोपण, प्रत्यक्ष मूर्ति कशी बनवतात प्रत्यक्ष पाहणी करून विदयार्थ्यांना उद्योग कौशल्याची माहिती दिली. वेगवेगळ्या संकल्पना शाळेत राबवुन त्या प्रत्यक्ष पणे साकारण्यासाठी धरपड करत विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव दिला.शिक्षणाच्या या प्रवाहात कुणीही वंचीत राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी
कुलूप सारख्या लघुचित्रपट निर्माण करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्वांसमोर मांडला या चित्रपटास राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. शाळेमध्ये विविध उपक्रम मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी सदैव तत्पर असतात.
दन्त शिबीर,सामाजिक प्रबोधन कार्यक्रम,कब बुलबुल पथकाचे संचालन,सलग दोन वर्षे क्रमांक1,2 पटकावला.शाळेत सहकार्याच्या मदतीने विविध संस्थेचे कार्यक्रम शाळेत राबवले.रोटरी क्लब,सेवाभावी संस्था, व स्वखर्चातून मुलांन साठी शालेय साहित्यची मदत केली.या
 कार्याची दखल घेऊनअनेक संस्थांनी  त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून विविध पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे , त्यांच्या कार्याचा हा आलेख उंच उंच गगनभरारी घेत आहे म्हणून आज पुन्हा त्यांच्या यशस्वी कार्याची सामाजिक उपक्रमाची कामगिरी बघून शिक्षण क्षेत्रातील हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती


*सत्य, अहिंसेचे, पुरस्कर्ते महात्मा  गांधीजी थोर राष्ट्रपिता होते--सौ. किर्तीताई पांगारकर*

बीड-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा पठाण तन्वीर सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री. गव्हाणे सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्रीमती चौधरी मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्री . जमाले सरांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले.सत्य, अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधीजी राष्ट्रपिता होते, महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य खूप मोठे होते गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लाभले, या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. भागडे सर यांनी केले तर आभार श्रीमती बहिरमल मॅडम यांनी मानले..