परिचय पत्र
संपूर्ण नाव- श्रीमती किर्ती श्रीधरराव पांगारकर
जन्म दिनांक-
*मुख्याध्यापिका*- विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड
*आजपर्यंत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भूषवलेली पदे*
सहशिक्षिका
*प्रथम नियुक्ती*
०१/०८/१९९० पासून गजानन विद्यालय राजुरी (नं) येथे सहशिक्षिका म्हणून कार्य शैक्षणिक करण्यास सुरुवात करण्यात आले.
*मुख्याध्यापिका*
8 वर्षाच्या यशस्वी अध्यापन कार्याच्या अनुभवावरून स्व. माजी खासदार केशरकाकूंच्या आग्रहाखातर १९९० पासून विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे.
*उल्लेखनीय शैक्षणिक कार्य*
गोरगरीब मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच तत्पर राहात विविध मदत,सहकार्य करत पालकांच्या अडीअडचणी सोडवून शिक्षणाचे महत्त्व लक्षात आणून मार्गदर्शकाची भूमिका निभावली.
*शालेय उपक्रम*
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सणसमारंभ शाळेत साजरे करून विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा.त्यांच्या अंगी आत्मविश्वास वाढावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी . विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचबरोबर आपली संस्कृतीही जोपासली जावी.ही विनायक प्राथमिक शाळेची उद्दिष्टे असल्याने शाळेमध्ये विविध सण - समारंभ मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी नेहमीच अग्रभागी राहून भूमिका निभावली.
*सहशालेय उपक्रम*
गुरुपौर्णिमा, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, पालक मेळावा, योग दिन, वाचन प्रेरणा दिन ,विविध स्पर्धा,आनंद नगरी, शैक्षणिक सहल,वनभोजन ,सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन,माझी माती, माझा देश अशा सहशालेय उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून मार्गदर्शकाची भूमिका निभावली.
*उल्लेखनीय कार्याची दखल*
*भारत स्काऊट गाईडच जिल्हा सरचीटनीस म्हणून निवड*
*जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा यशवंतराव होळकर राज्यस्तरीय आदर्श सहशिक्षिका पुरस्कारासाठी निवड झाली.*
*लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात खुप व्यापक स्वरूपामध्ये होम मिनिस्टर २०२४ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले*