Sunday, 1 October 2023

महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री जयंती २ ऑक्टोबर २०२३

 *विनायक प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री  यांची जयंती साजरी* 


(बीड प्रतिनिधी)-दि-२ऑक्टोबर रोजी विनायक प्राथमिक शाळा, पेठ बीड येथे महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याचा आढावा अजीजराजा शेख सरांनी आपल्या प्रास्ताविकातून घेतला. महात्मा गांधी हे अहिंसेचे पाईक व शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाभले, भारतीय स्वतंत्र चळवळीत महत्वाचे योगदान देणारे लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते असे आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून श्री.अशोक काशीद सरांनी त्यांचे कार्य व्यक्त केले.गांधीजी हे एक अनमोल रत्न भारतास लाभले त्यांच्याविषयी सविस्तर माहिती श्रीमती सिमा उदगीरकर मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जीवनातील वेगवेगळे घडलेले प्रसंग आपल्या खास शैलीत श्रीमती महानंदा मुंडे मॅडमनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले. महात्मा गांधींच्या जीवनातील भारताच्या स्वतंत्र चळवळीतील त्यांनी दिलेले योगदान खूप मोलाचे आहेत त्यांचे कार्य खूप मोठे होते गांधीजीच्या अथक, प्रामाणिक देशसेवेचे कार्य अजरामर राहील तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे पण चळवळीतील योगदान खूप महत्वाचे आहे या दोन्हीही व्यक्तिमत्वाचे आदर्श आपण जपले पाहिजे त्यांच्या मार्गावरून आपण पुढे चालले पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लाभले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. गणेश भागडे सर यांनी केले तर आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडमनी मानले.