Tuesday, 1 August 2023

अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम १ ऑगस्ट २०२३

 *अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक अजरामर कर्तबगार व्यक्तिमत्व*-  सौ.किर्तीताई पांगारकर


    (बीड प्रतिनिधी )-१ऑगस्ट या रोजी विनायक प्राथमिक शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे उत्तरेश्वर भारती सर, शिवलिंग क्षीरसागर सर,अजिंक्य चांदणे सर,अशोक काशीद सर, दिलीप तकीक सर, भारती ताई क्षीरसागर मॅडम,शैलजा बावसकर मॅडम, सुनिता चौधरी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन प्रतिभा वाघमारे मॅडमनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा सांगितला, त्यानंतर विविध लहान मुलां- मुलींनी या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले, प्रमुख वक्ते अजिंक्य चांदणे सरांनी  लोकमान्य टिळकांची राष्ट्रभक्ती, त्याग, प्रगल्भता, आक्रमकपणा, स्वाभिमानी बाणा या टिळकांच्या पैलूंवर प्रकाश टाकला तर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन, शाहीर, लोककला मातंग समाजातील  वास्तव जीवनातील यथार्थ चित्रण, शैक्षणिक, सामाजिक धोरण, अंगी असणारी शाहीरीतुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रवृत्त करणारी लेखनशैली खूप प्रेरणादायी आहे असे आपल्या भाषणांतून व्यक्त केले, त्यानंतर श्री. तन्वीर पठाण सरांनी आपल्या खास शैलीत दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील वास्तवता त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले, संगिता वडमारे मॅडम व शेख शेहेबाज सरांनी टिळकांचा बाणेदारपणा व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील गोष्टी बालकांना सांगून,टिळक व साठे यांचे चित्र डोळ्यासमोर आणून मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन केले.अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक अजरामर कर्तबगार व्यक्तिमत्व होऊन गेले.या महान व्यक्तिमत्वाच्या प्रभावी जीवनकार्याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांच्या समोर उभा केले, टिळकांचा जहाल विचार व केलेले संघटन देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी दिशादर्शक ठरले, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, गरीबी, यामधून पुढे येऊन समाज जागृत करण्यासाठी लेखन कला, शाहीरी, कथा-कादंबऱ्या, पोवाड्याच्या माध्यमातून समाज जीवनाचं वास्तव दर्शन विशद केले.या थोर महान व्यक्तीना अभिवादन करण्यात आले.या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन  विवेक गव्हाणे सरांनी केले तर आभार संजीवनी पवळ मॅडम यांनी मानले.