Monday, 26 June 2023

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती २६ जुन २०२३





 *विनायक प्राथमिक शाळेत सामाजिक न्याय दिन साजरा*


    दि-२६ जुन(बीड प्रतिनिधी)-विनायक प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.याप्रसंगी शाळेचे जेष्ठ शिक्षक  अशोक काशीद सर, भारती क्षीरसागर मॅडम, शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर, तन्वीर पठाण सर,विवेक गव्हाणे सर,शैला बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,उत्तरेश्वर भारती सर बाळू काळे सर, अजिंक्य चांदणे सरांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कला, क्रिडा,शिक्षण संस्कृती यांना राजाश्रय देणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायांचे पालनकर्ता होते.गोरगरिबांना आरक्षण देणारे ते पहिले राजे होते.मुलां मुलींना शाळेत  शिक्षणासाठी न पाठवल्यास पालकांना दंड ठोकवणारे राजे शाहू महाराज दूरगामी विचारांचे पाईक होते  त्यांच्या दूरगामी शिक्षणव्यवस्थेचे आजही चांगले परिणाम आपल्याला पाहायला दिसून येत आहे.शिक्षणाचे महत्व जाणून प्रोत्साहन देणारे राजे म्हणजेच 'छत्रपती शाहू महाराज'

त्यांचे विचार,आदर्श नेहमीच आपल्या स्मरणात राहतील त्यांच्या जीवनविषयक कार्याची अजरामर कीर्ती नेहमीच आपल्याला प्रेरणा देईल असे मौलीक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन वर्षा म्हेत्रे मॅडमनी  केले तर आभार सिमा उदगिरकर मॅडमनी मानले..













Thursday, 22 June 2023

जागतिक योग दिन २१ जुन२०२३

 विनायक प्राथमिक शाळेत जागतिक योग दिन साजरा*

दि.२१जुन-(बीड प्रतिनिधी)जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधनेचे आयोजन करण्यात आले.शाळेतील योग प्रशिक्षक शिक्षक श्री.काशीद अशोक सर, सुनीता चौधरी मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,उत्तरेश्वर भारती सर ,बाळू काळे सर,भारती क्षीरसागर मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,तन्वीर पठाण सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्व समजावून सांगितले.काही योगासनांची प्रात्यक्षिके स्वतः करून विद्यार्थ्यांना काही आसन करावयास लावले.योग दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर,सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी सहभागी झाले होते.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये योग दिनाचे यशस्वी आयोजन शाळेमध्ये करण्यात आले.