विनायक प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा
दि-०६ मे(बीड प्रतिनिधी)-विनायक प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची स्मृतिदिन साजरा करण्यात आला.स्मृतिदिना निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.याप्रसंगी शाळेचे जेष्ठ शिक्षक उत्तरेश्वर भारती सर, अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर,शैला बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम, मुंडे मंगल मॅडम, बाळू काळे सर, अजिंक्य चांदणे सरांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. या दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे धर्मनिरपेक्ष तत्वांचे पालनकर्ते होते व त्यांच्या दूरगामी शिक्षणव्यवस्थेचे आजही चांगले परिणाम आपल्याला पाहायला दिसून येत आहे.त्यांचे विचार, आदर्श नेहमीच आपल्या स्मरणात राहतील त्यांच्या जीवनविषयक कार्याची अजरामर कीर्ती नेहमीच आपल्याला प्रेरणा देईल असे मौलीक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वार्षिक निकालाच्या शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.गणेश भागडे सरांनी केले तर आभार श्रीमती पवळ संजीवनी मॅडम यांनी मानले..