*विनायक प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत*
(बीड प्रतिनिधी) - दि १५ जुन २०२२ रोजी विनायक प्राथमिक शाळेत नवीन इयत्ता १ ली प्रवेशीत विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन करून उत्साहपूर्ण वातावरणात शालेय कामकाजाची सुरुवात करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी नवीन प्रवेशीत मुला मुलींचे त्यांच्या आईवडिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांचा उत्साह वाढवला .खुप मोठ्या उत्साहात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवेशोत्सव आयोजीत करून शालेय वातावरण उत्साहपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी विविध पालकांनी शाळेला भेट देऊन शालेय व्यवस्थापनेचा आढावा घेऊन परिस्थिती जाणून घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती दर्शवली. शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळेतील सर्व मुला मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शाळेत नियमित उपस्थित राहावे,शालेय अभ्यासक्रम नियमित करण्यात यावा दररोजचा अभ्यास,गृहपाठ नियमितपणे करावा असे अहवान करण्यात आले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहिले.