*विनायक प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
दि. १४ एप्रिल ( बीड प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे प्रणेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते भारतीताई क्षीरसागर, अशोक काशीद सर,महानंदा मुंडे मॅडम, शैलजा बावसकर, दिलीप तकीक सर,तन्वीर पठाण सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा माहिती शाळेचे शिक्षक अजीजराजा शेख सरांनी दिली.शाळेतील शिक्षिका प्रतिभा वाघमारे मॅडम,संगिता वडमारे मॅडम, रिता वाघमारे मॅडम यांनी ज्ञानाचा अथांग सागर भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करून दिनदलितांचे कैवारी, न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करून अजरामर झाले अशा महामानवांच्या विचारांची आजही गरज आहे असे महत्वपूर्ण विचार व्यक्त करून अभिवादन व्यक्त केले. या जयंतीनिमित्त शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.या जयंतीनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.