*माणसात देव शोधणारा संत म्हणजेच संत गाडगेबाबा*- सौ. किर्तीताई पांगारकर
(बीड प्रतिनिधी)- दि.२३फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक जगन्नाथ काळे सर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा आढावा शाळेचे श्री.अशोक काशीद सरांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना करून दिला. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. संत गाडगेबाबा यांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रध्देला प्रखर विरोध केला.अनेक प्रसंगी स्वतः पुढाकर घेऊन सामान्य माणसांना अंधश्रध्देपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले असे प्रतिपादन आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर विचारांतून श्री.जगन्नाथ काळे सरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेतील मंगल क्षीरसागर मॅडम, महानंदा मुंडे मॅडम, अजिंक्य चांदणे सर,शैला बावसकर मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम,श्री. उत्तरेश्वर भारती सर, शिवलिंग क्षीरसागर सर, दिलीप तकीक सर, अजीजराजा शेख सर, गणेश भागडे सर, मनीषा चौधरी मॅडम, वर्षा म्हेत्रे मॅडम, विवेक गव्हाणे सर ,सुनीता चौधरी मॅडम ,संजीवनी पवळ मॅडम, शारदा बहिरमल मॅडम, अनिल लेहने सर यांनी संत गाडगेबाबा यांची माहिती विद्यार्थ्यांना भाषणांतून करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय समारोपातून स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला.असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय.माणसातील देव ओळखायला शिका.प्राणीमात्रांवर दया करा. निसर्गावर प्रेम करा.असे ते कीर्तनातून लोकांना सांगत होते.गाडगेबाबांच्या हातातील झाडूंनी कमाल केली.स्वच्छतेचा मंत्र त्याचबरोबर लोकांच्या वैचारिकतेला स्वच्छ केले.दिवसभर गाव स्वच्छ करायचे तर रात्री स्वतःच्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोकी लोकांचे विचार स्वच्छ करण्याचे काम संत गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केले.समाज सुधारण्यासाठी समाजातील तळागाळात त्यांनी वैचारिकतेचा प्रकाश टाकला. अशी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वीर पठाण सरांनी केले तर उपस्थित अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे आभार प्रतिभा वाघमारे मॅडम यांनी मानले.