Wednesday, 12 January 2022

विनायक प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी २०२२

 *विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

बीड- दि.३जानेवारी(बीड प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस विनायक प्राथमिक शाळेत 'बालिका दिन, महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा सुनिता चौधरी मॅडमनी प्रास्ताविकातून घेतला. सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जागर विविध शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक शैक्षणिक योगदानाचे महत्व आपल्या भाषणांतून व्यक्त केले. शाळेतील शिक्षक बाळू काळे सर,तन्वीर पठाण सर, अशोक काशीद सर, अजिंक्य चांदणे,शारदा बहिरमल मॅडम,संजीवनी पवळ मॅडमनी

समाजातील अज्ञान,अंधार दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी खुप कष्ठ घेतले.ज्ञानाची,शिक्षणाची ही गंगा मुलींना खुप लाख मोलाची आहे.सावित्रीबाईंच्या विचाराचा,सामाजिक विचारांचा, शैक्षणिक कामाचा हा अनमोल वारसा "आम्ही सावित्रीच्या लेकी पुढे नेऊ, त्यांच्या कर्तव्याचा जागर, स्त्रियांच्या मनामनात करवू,तुझे स्वप्न सावित्रीचे साकार करू"  सावित्रीबाईंच्या फुलेंच्या विचाराने प्रभावित होऊन स्व.लोकनेत्या माजी खा.केशरकाकू क्षीरसागरांनी एक महिला म्हणून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गुणगौरव आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी भावना व्यक्त केल्या व सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची प्रेरणा,शक्ती,ऊर्जा देणाऱ्या स्फूर्ती गीतातून सावित्रीबाई फुलेंना आदरांजली वाहिली.विविध मुली सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत येऊन लक्ष वेधीत होत्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लेहने सरांनी केले तर आभार उत्तरेश्वर भारती सरांनी  मानले.