*शांत,संयमी स्वभावाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक वैजीनाथ गिराम सर*-सौ.किर्तीताई पांगारकर (बीड प्रतिनिधी) दि.३१ऑक्टोबर-या रोजी बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेत जेष्ठ शिक्षक श्री.वैजीनाथ गिराम सरांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे नानासाहेब जाधव, पत्रकार इम्रानजी शाह,मार्गदर्शिका सौ.भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व स्व. लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.श्री.गिराम सरांच्या व्यक्तिपरीचयाची ओळख आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून श्री.अशोक काशीद सरांनी करून दिली. वयाच्या ५८ व्या वर्षी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे गिराम सर एक असामान्य व्यक्तिमत्व,ग्रामीण शहरी भागामध्ये परिचित आहेत.अत्यंत गरिबीमधून पुढे येत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केले असे विचार नानासाहेब जाधव साहेबानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.शाळेमध्ये हसत, खेळत रमणारे, मोकळ्या स्वभावांच्या गुणांनी पूर्ण असणारे व्यक्तिमत्व सदैव साधे,सरळपणे विद्यार्थ्यांना प्रिय राहिले असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका सौ.भारती क्षीरसागर मॅडम यांनी मांडले. वैजीनाथ गिराम सरांच्या आठवणींचा, कार्याचा उजाळा श्री. तन्वीर पठाण सरांनी आपल्या मनोगतातून घेतला.शाळेचे शिक्षक श्री.गणेश भागडे सर, अजिंक्य चांदणे सर, शिवलिंग क्षीरसागर सर, संजीवनी पवळ मॅडम या सर्वांनी वैजीनाथ गिराम सरांचे वेगवेगळे शाळेतील पैलू व त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून कौतुक केले.सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या कौतुक सोहळ्यासाठी,सर्व उपस्थित मित्रपरिवार,नातेवाईक यांच्या उपस्थितीने वैजीनाथ गिराम सरांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांसाठी आयुष्यभर त्यांच्यासाठीच कार्य करेल असे प्रतिपादन सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री.वैजीनाथ गिराम सरांनी आपल्या भाषणातून विचार मांडले. वयोमानानुसार निवृत्त जरी झाला असताल तरी विनायक परिवाराच्या मनामधून निवृत्त नाही झालात. दिलेल्या जबाबदाऱ्या,दिलेलं काम तितक्याच विनम्रपणे स्वीकारून पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे गिराम सर शांत,संयमी स्वभावाचे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून कार्यरत राहीले.या सेवानिवृत्ती नंतर त्यांची उणीव विनायक प्राथमिक शाळेला नक्कीच भासेल असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी वैजीनाथ गिराम सरांचे संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार या सर्वांनी सरांचा सत्कार करून उपस्थिती दर्शवली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला.हा सेवानिवृत्ती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री.बाळू काळे सरांनी मानले..
*आज आपल्या शाळेचे जेष्ठ शिक्षक ,शांत संयमी व्यक्तिमत्व श्री. वैजीनाथ गिराम सर यांच्या सेवनिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे..... गिराम सरांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद.. आज आपण श्री. गिराम सरांना शाळेतून निरोप देतोय.. गिराम सरांनी विनायक प्राथमिक शाळेत गेली २८ वर्ष,४महिने,१६ दिवस अशी प्रदीर्घ सेवा केली.. बीड तालुक्यातील भवानवाडी या छोट्याशा गावांमध्ये दि. ५/१०/१९६३ ला एका गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला.. त्यांच्या वडिलांचे नाव भागूजी विठोबा गिराम व आईचे नाव गंगुबाई भागूजी गिराम. त्यांच्या आईवडिलांनी मोलमजुरी करून त्यांना घडवले, शिकवले.. गिराम सरांच्या वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी गिराम सरांच्या आईचे निधन झाले.. तेंव्हापासून त्यांच्या वडिलांनी व त्यांच्या मोठ्या तीन भावांनी मोठे कष्ट करून त्यांना शिक्षणासाठी पुढे केले.. स्व. केशरकाकू क्षीरसागर, व जयदत्त (अण्णा) क्षीरसागर साहेब जेंव्हा १९९३ ला शिवणी भवानवाडी साठवण तलावाच्या परिसरात जनावरांच्या चारा छावणीच्या उद्धघाटनाला गेले होते तेंव्हा त्याकाळचे भवानवाडी या गावचे सरपंच प्रल्हादराव जगताप यांच्या शिफारशीनुसार अण्णासाहेबांनी दुसऱ्याच दिवशी विनायक प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीची ऑर्डर दिली.आज गिराम सरांचा परिवार खूप मोठा आहे. तीन मोठे भाऊ, दोन बहिणी, पत्नी,दोन मुले, न एक मुलगी,जावई,नातवंडे असा मोठ्या सुखात आहे याचा अभिमान मला वाटतोय..एका मुलाने बी.एस्सी.केले तर दुसरा मुलगा कॉम्पुटर इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षात आहे... तस पाहिलं तर गिराम सरांचे विनायक प्राथमिक शाळेत महत्वपूर्ण योगदान राहिले.. शाळेतील मुलांच्या आणण्या,सोडण्यापासून तत्परतेने जबाबदारी त्यांनी स्विकारुन चांगले संस्कारमय अध्यापन कार्य केले त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे..आज नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होतायत.. खुप दुःखही वाटतेय..! एक विनायक परिवारातील एक आधार असणारे जेष्ट शिक्षक उद्या शाळेत वर्गामध्ये मुलांना शिकवताना दिसणार नाहीत .. ही खंत वाटतेय*.. *पण त्याला सामोरे जावेच लागेल..! गिराम सरांचे शैक्षणिक कार्य चांगले राहिले, शांत, संयमी,धीरोदत्त स्वभाव असे अंगी असणारे गुण आम्हाला आदर्श देऊन जाईल.. तुमची उणीव शाळेत नेहमीच भासेल..*! *तुम्ही आज निरोप घेताय आमचा, आले भरूनिया डोळे... २८ वर्षांतील दिवस बनले,स्मृरणांच्या पुस्तिकेतील पाने*.... *शाळेसाठी तुम्ही दिलेले योगदान नेहमीच आठवणीत सदैव राहील*......... *निरोप तुम्हांला देतांना शब्द गोठून गेले,शाळेचे तुमच्या कामातून व्यक्त होऊन गेले* *आज निरोप देतांना तुम्हांला, आले डोळे भरून, देवाकडे आता एकच प्रार्थना, इच्छा साऱ्या तुमच्या द्यावा पूर्ण करून..* गिराम सर मी *पाहिलं तुम्हांला आदर्शांचा गाडा हाकताना, स्वाभिमानी जगतांना, प्रेमाने पाठीवर हात फिरवताना, संस्काराच्या वेळी विद्यार्थ्यांना रागावतांना,संकटात वादळ थोपवतांना*... *असे बरेच अनुभव वेळोवेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देतांना,अध्यापन कार्य करतांना शाळेला मिळाले*. *निरोपाचा क्षण जणू, हळव्या त्या फुलांचा,आठवांची जणू गर्दी, क्षण हा विरहाचा*... *नको नको वाटे निरोप, घेऊन येतो दुःखद क्षण, पण ते गाठण्या यशोशिखर , घेऊ शपथ प्रत्येक जण*.. *निरामय आरोग्यदायी, निखळ आयुष्य जगा ही सदिच्छा, निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी तुम्हांला शुभेच्छा..* *जीवनाचा आनंद पुरेपूर मिळावा, नाताच्या सुरांमध्ये सूर तुमचा जुळावा...* *सर्व त्या इच्छा पूर्ण आता करा, जीवनाचा कलश आनंदाने भरा*.. *या शाळेच्या आठवणींनी कधी मन भरून येईल, नाताच्या बोबड्या बोलात विरघळून जाईल*... *असं नाही म्हणत मी आम्हांला पूर्ण विसरून जा...काही क्षण तुमचे शाळेसाठीही द्या...* *पूर्ण होवोत तुमच्या पुढील मनातल्या इच्छा... पुढील आयुष्यासाठी तुम्हांला खुप खूप शुभेच्छा*...! .......धन्यवाद......