Friday, 2 August 2019

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती विनायक प्राथमिक शाळेत साजरी २०१९

*विनायक प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी*..
दि-१ऑगस्ट (बीड प्रतिनिधी) विनायक प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यपिका सौ.किर्तीताई पांगारकर व प्रमुख पाहुणे श्री.उत्तरेश्वर भारती सर,श्री. वैजिनाथ गिराम सर,गव्हाणे सर













यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री. तन्वीर पठाण सरांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला, त्यानंतर विविध लहान मुलां- मुलींनी या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले,लोकमान्य टिळकांची राष्ट्रभक्ती, त्याग, प्रगल्भता, आक्रमकपणा, स्वाभिमानी बाणा या टिळकांच्या पैलूंवर श्री. अशोक काशीद सरांनी प्रकाश टाकला तर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र लेखन, शाहीर, लोककला मातंग समाजातील यथार्थ चित्रण, शैक्षणिक, सामाजिक धोरण, अंगी असणारी शाहीरीतुन प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रवृत्त करणारी लेखनशैली खूप प्रेरणादायी आहेअसे आपल्या खास शैलीतून सौ.भारतीताई क्षीरसागर मॅडम यांनी विचार व्यक्त केले, दोन्ही महान व्यक्तींच्या जीवनातील वास्तवता,टिळकांच्या बाणेदारपणा व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील गोष्टी,टिळक व साठे यांचे कार्याविषयी आपल्या भावना शैला बावसकर मॅडम यांनी व्यक्त केल्या,त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर यांनी लोकमान्य टिळक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून, या महान व्यक्तिमत्वाच्या प्रभावी जीवनकार्याचे वास्तव चित्र विद्यार्थ्यांच्या समोर उभा केले, टिळकांचा जहाल विचार व केलेले संघटन देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रेरक ठरले, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, गरीबी, यामधून पुढे येऊन समाज जागृत करण्यासाठी लेखन कला, शाहीरी, कथा-कादंबऱ्या, पोवाड्याच्या माध्यमातून समाज जीवनाचं वास्तव दर्शन विशद केले,दोन्हीही या महान व्यक्तीच्या जीवनातील स्वभावाची माहिती काही गोष्टींच्या उदाहरणातून स्पष्ट करून दिल्या, या कार्यक्रमाप्रसंगी भाषण करणाऱ्या मुलांचं विशेष बक्षीस देऊन कौतुक मॅडम यांनी केले,या दोन्हीही महान व्यक्तींना अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त केले.या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले,कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन भागडे गणेश सरांनी केले तर आभार श्रीमती सुनीता चौधरी मॅडम यांनी मानले.