Saturday, 9 March 2019

जागतिक महिला दिन विनायक प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा..

*विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
बीड (प्रतिनिधी)-दि-८ मार्च रोजी विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध शालेय, सांस्कृतिक, प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे उद्घघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊं, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,लोकनेत्या स्व. माजी खासदार केशरकाकूं क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या योगा प्रशिक्षक सौ.शारदा शिंदे मॅडम यांची खास उपस्तिथी होती.शाळेच्या सर्व शिक्षक वृंदातर्फे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर व सर्व शिक्षिका यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
   शाळेचे शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला एक उत्तम प्रशासक आहेत.भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी आपल्या कार्याने अजरामर कीर्ती निर्माण केली.जागतिक महिला दिनाचे महत्व आपल्या खास कवितेतून व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या.शाळेतील शिक्षक विवेक गव्हाणे सरांनी महिला दिनानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व महिला शिक्षिका यांच्या विषयी ऋण व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.संस्थेच्या उपाध्यक्षा भारतीताई क्षीरसागर मॅडम यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून महिलांचे प्रत्येक यशाच्या पाठीमागे खंबीर असे योगदान खुप मोलाचे आहे असे आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई यांच्या खास जिवाभावाच्या मैत्रीण असणाऱ्या सौ.शारदा शिंदे मॅडम यांनी स्वतः शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई यांच्याविषयी आपल्या कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त करत असताना उपस्थित महिला भगिनी व किर्तीताईंच्या डोळ्यांच्या अश्रुधारा यांना वाट मोकळी करून आपल्या मैत्रीचा कृतज्ञता भाव व्यक्त केला.
    हा अतिशय उत्साहात जागतिक महिला दिन साजरा होत होता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी अतिशय आपल्या खास काव्यात्मक शैलीतून भावना व्यक्त करताना स्व. केशरकाकूं यांचा स्नेह व शाळेतील सर्व शिक्षिका यांच्याविषयी असणाऱ्या भावनात्मक बंधांचे प्रेम व्यक्त करत महिलांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या थोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊंचे आदर्शाने या महान महिलांनी देशासाठी आदर्श असे कार्य केले आहे म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अभिमानाने सांगावे लागेल असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.शाळेतील सर्व शिक्षिका यांनी आपापल्या महिलांच्या महती व कार्याच्या खास कविता महिला दिनाचे औचित्य साधून सादर करून एक आगळावेगळा जागतिक महिला दिन साजरा केला.सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने बाळू काळे सर यांनी पण आपल्या काव्यात्मक रचनेतून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
   शाळेच्या सर्व महिला शिक्षकांची खास या महिला दिनाच्या निमित्ताने प्रश्नमंजुषा ही स्पर्धा घेऊन एकप्रकारे महिलांचे उल्लेखनीय कामगिरी आजमावण्याचा खास प्रयत्न करण्यात आला. हा अतिशय आनंदमय जागतिक महिला दिवस शाळेमध्ये उत्साहात पार पडला यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण चव्हाण मामांचे मोलाचे खास सहकार्य लाभले.
     कार्यक्रमाचे बहारदार असे संचलन आदर्श शिक्षक तन्वीर पठाण सरांनी केले तर आपल्या खास हास्याच्या विनोदाने अजीराजा शेख सरांनी उपस्थित मान्यवरांचे आपल्या खास अशा काव्यात्मक अविष्काराने आभार व्यक्त केले.





जागतिक महिला दिन " किर्तीताई " व्यक्ती विशेष शुभेच्छा




*आमच्या आधार "किर्तीताई"  आभाळाएव्हढी माया तुमची आम्हांवरती राहू द्या* ......
       जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांची शाळेविषयी असणारी आत्मीयता खुप काही सांगुन जाते.प्रसंग सुखाचा असो वा दुःखाचा शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या आधार व आसरा देणारी ममता या व्यक्तीमत्वात दिसून येते.शांत व संयमी स्वभाव प्रत्येकाला भावनिक प्रगल्भता देतो.आपली शाळेतील प्रत्येक लहान मुला मुलींच्या स्वप्नामध्ये असणाऱ्या भावविश्वात रमून त्यांच्या आनंदात लहान होऊन आपलेपणाची भावना निर्माण होतांना आम्हीं पाहतो आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी चांगले सत्कार्य आवश्यक आहे असे त्या नेहमी म्हणत असतात ते शब्द ते विचार काहीतरी चांगले करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देणारे वाटतात. शाळेमध्ये अनेक कौशल्य पारंगत लोक सांभाळण्याची कला आपल्या शांत व संयमी स्वभावाने कशी हाताळतात ते कळत नाही.काहीतरी जादू त्यांच्या स्वभावामध्ये आहे.शाळेच्या मूलभूत विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तेसाठी सतत त्या नवनवीन कल्पना सुचवुन अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.
    तुम्ही आमच्या आदर्श आहात,
प्रेरणा आहात.उपक्रमशील विचारांचे एक साक्षात विद्यापीठ असणाऱ्या ताईंचे कौतुक करावे वाटते. प्रत्येक दिवशी नवीन नवीन व्यक्तिरेखांच्या भूमिकेतून शाळेची जबाबदारी सहजतेने निभावत असतात.सर्वाना सोबत घेऊन प्रत्येक गोष्टीचा सारासार विकास करण्यासाठी त्या पुढाकार घेत असतात.
      कधी कठोर रागाने बोलल्यानंतरही हळुवारपणे स्वतः दुःखी होऊन तितक्याच भावनेने रागावर नियंत्रण ठेवून काळजी घेण्याचे काम त्या करतात याचा आम्हाला खुप खुप हेवा वाटतो.आम्हीही आमची चुक सुधारून,राग विसरून तितक्या क्षणांचा राग विसरतो व पुढील कामाला लागतो.मनात काहीही ठेवत नाही काही झालेच नाही ही भूमिका घेऊन काम करू लागतो. ही कला आम्हांला ताई तुमच्या आदर्शरूपी स्वभावातून आम्हांला दिसते.शाळेचा प्रत्येक घटक आपला परिवार आहे त्यासाठी त्या कार्य करत आहे.एक महिला उत्तम प्रशासन चालवण्याचा तुम्हीं आदर्श आहात हे मोठ्या आत्मीयतेने आम्हांला सांगावेसे वाटते.ते शब्दांमध्ये प्रतिबिंबित करतांना सुचत नाही परंतु या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्हांला आपल्या कृतज्ञता व्यक्त कराव्या वाटतात. अनेक महिला आज जागतिक स्तरावर आपल्या कर्तव्याने कीर्ती करून देशाच्या इतिहासात अजरामर होऊन गेल्या. त्यांच्या शौर्याच्या गोष्टी अभिमानाने आपण सांगत असतो. तशाच आमच्या शाळेच्या प्रमुख किर्तीताई, भारतीताई यांच्या शांत व संयमी हसमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव खूप काही आम्हांला स्वाभिमान शिकवून जातो.त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम मोठ्या जबाबदारीने आम्हीं पार पाडत असतो.शाळेच्या सर्व महिला शिक्षिका या पण ताईंच्या विचाराने उत्कृष्ट अध्यापन करत असतात, त्यांना पण या महिला दिनाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा.
     आपल्या शाळेतील शिक्षक जमाले सर यांच्या आरोग्यासाठी कीर्तीताई नेहमी खुप आधार देतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.आतापर्यंत आम्हीं देव देवळात आहे असे म्हणत होतो पण माणसातला देव आज आम्ही साक्षात पाहतो आहे या गोष्टीवरून समजून येते,नाहीतर जमाले सर आजपर्यंत जगले नसते.हे आम्हीं जवळून पाहतो. प्रत्येक शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्या सुख दुःखात किर्तीताई नेहमी पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात हे आवर्जून सांगावेसे वाटते.
     आपल्या शाळेतील मुंडे मॅडमच्या मुलाच्या लग्नास नाशिकला गेलो होतोत.लग्न समारंभ दुपारी आटोपल्यावर आपण आम्हांला दिंडोरीला दर्शनाला बोलावून घेतले.आम्हांला माऊलींचे दर्शन होण्यासाठी खूप आतुरतेने तळमळ करत होतात त्यामुळेच माऊलींचे दर्शन आम्हांस लाभले. आम्हांला स्वामी समर्थ महाराजांचे पुस्तक ग्रंथ भेट दिला. तो ग्रंथ खुप महत्वाचा आहे. आपल्या शाळेतील मुला मुलींच्या संस्कारासाठी तुम्हीं या ग्रंथाचे वाचन करून शाळेत आपल्या मुलांना संस्कारीत करा असे म्हणाल्या.त्याक्षणी किर्तीताई यांच्यामध्ये आपल्या शाळेसाठी किती आत्मीयता आहे हे दिसून आले.त्यानंतर आम्हांला वेगवेगळे आयुर्वेदीक वस्तू आरोग्यासाठी घ्या म्हणाल्या. त्या दुकानाकडे जात असताना आरोग्यासाठी आवश्यक विविध औषधी वस्तु खुप चांगल्या आहेत असं सांगत होत्या. त्यामध्ये त्यांची आमच्याविषयी असणारी काळजी दिसून येत होती.त्यानंतर आम्हां सर्वांना शरबत पिऊ घातलेव गाडीकडे आम्ही निघालो.दुपारचे 5 वाजले होते.किर्तीताई म्हणाल्या बीडला रात्रीं जाण्यास उशीर होणार आहे त्यामुळे आपण सगळे दोन्हीही गाड्या सोबत जाऊ अस म्हणाल्या.ताईंनी गाडी चालकास सांगितले की आपल्या दोन्हीही गाड्या सोबत बीडला जातील.आमच्याअगोदर किर्तीताइंची गाडी लवकर बीडला पोहचणार होती पण त्यांची गाडीही आमच्या सोबत राहिली.यापाठीमागे किर्तीताईंचा दुरदृष्टिपणा दिसून येतो एक महिला असताना सुद्धारात्रीचा प्रवास असल्यामुळे रस्त्यात काही अडचण येऊ नये म्हणून त्या आमच्यासाठी रात्रभर आमच्या गाडीच्या पाठीमागे होत्या.पठाण सरांना वेळोवेळी संपर्क करण्यास सांगत होत्या. गाडी वेगाने चालवू नका,झोप येत असेल तर वाटेत चहा घ्या असं वेळोवेळी असणारी काळजी त्या नाशिक बीड च्या प्रवासामध्ये किर्तीताई घेत होत्या हे आवर्जून  आम्हाला सांगावे वाटते. किती आपुलकी, किती आत्मीयता किर्तीताई च्या स्वभावातून ओसंडून वाहते ते शब्दांमध्ये आम्हाला त्याचे रेखाटन करता येणार नाही म्हणून अशा आपल्या सर्वांच्या आधार, प्रेम माया, ममता,आपुलकीची जाणीव ठेवणाऱ्या किर्तीताई तुम्हीं खुप महान आहात म्हणून या महिला दिनाचे औचित्य साधुन आपल्या शांत,संयमी स्वभावाचे गुण जागृत करून आपला आदर, सन्मान करणं हे आम्हांस योग्य वाटते.
    शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या किर्तीताई सदैव मार्गदर्शकाची भुमिका साकारत शैक्षणिक नवनवीन कल्पना, तीची जोपासना,अंमलबजावणी, गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक मोफत साहित्य वाटप करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करतात याचा आम्हांला खुप खूप अभिमान वाटतो. अशी मदत, सहकार्य, अशा गरीब,वंचीत मुलांना आधार त्या विविध प्रकारचे उपक्रम राबवून करत असतात, एक महिला प्रशासक म्हणून, शाळेच्या प्रमुख म्हणून, शाळेच्या आधार असणाऱ्या किर्तीताई तुमचे कामही खुप मोलाचे आहे.या महिला दिनाच्या प्रसंगी आपल्यातील मोठेपणा, अंगीकृत गुण, तत्परता, जबाबदारी ही गोरगरीब विद्यार्थी व आम्हां शिक्षक, शिक्षकांसाठी लाख मोलाची आहे.आभाळाएव्हढी माया तुमची आम्हांवरती राहू द्या, तुमचे विचार सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जबाबदाऱ्या आम्ही यशस्वीपणे पूर्ण करून आणखी चांगले कार्य, कर्तव्य निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले हे कार्य पाहून आपला सन्मान एक महिला म्हणून करावासा वाटतो. तुम्हांस जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐💐
         -सर्व शिक्षक,शिक्षिका वृंद
             विनायक प्रा.शा.बीड

Monday, 4 March 2019










*विनायक प्राथमिक शाळेत विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न*
बीड(प्रतिनिधी)-दि.१ मार्च रोजी विनायक प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या विविध शालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे उद्धघाटन शाळेच्या प्रमुख सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी भारतीताई क्षीरसागर,शैलजा बावस्कर मॅडम,सुनीता चौधरी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होत्या. शालेय विविध स्पर्धेत शाळेत अनेक मुला मुलींनी सहभागी होऊन प्राविण्य मिळवले होते.शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक शालेय स्तरांवर आदर्श शिक्षण संस्था,नवगण शिक्षण संस्था,विनायक,युवक कल्याण या संस्थेच्या माध्यमातून या विविध स्पर्धा शालेय स्तरांवर आयोजीत करण्यात आल्या त्याच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी अनेक मुलामुलींनी बक्षिसे मिळवली.शाळेच्या विकासात विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांचे विशेष महत्व आहे असे आपल्या प्रमुख अतिथीपर भाषणांतून संस्थेच्या उपाध्यक्षा भारतीताई क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.शालेय विविध स्पर्धेत पात्र मुलांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर ,भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते शैक्षणिक बक्षिसांच वाटप करण्यात आले.यावेळी मुलांमध्ये खूप आनंद व उत्साह वाढला होता.शाळेतील विविध शिक्षकांना उत्कृष्ट कामाबद्दल किर्तीताई यांच्या हस्ते सत्कारीत करून गौरविण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे उत्तरेश्वर भारती,वैजिनाथ गिराम सर,अशोक काशीद सर,वर्षा म्हेत्रे मॅडम,शारदा बहिरमल मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,दिलीप तकीक सर,सीमा उदगीरकर, मॅडम, बाळू काळे सर,विवेक गव्हाणे सर,मनीषा चौधरी मॅडम,महानंदा मुंडे,मंगल क्षीरसागर मॅडम,अजीजराजा शेख सर, अजिंक्य चांदणे सर,अनिल लेहणे सर,अमोल पाटोळे,शहेबाज शेख ,नईम पठाण सर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.जीवनाच्या प्रवासात अंगी असणाऱ्या कला व गुणांना वाव अशा शालेय स्पर्धेतून विद्यार्थ्यांना मिळतो.शैक्षणिक बौद्धिक व शारीरिक विकासासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.संस्थेचा सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचा हा यामागील मुख्य उद्देश आहे असे आपल्या अध्यक्षीय समारंभा प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी शालेय स्पर्धेची भुमिका व्यक्त करून या स्पर्धेच्या बक्षीस मिळवलेल्या विजेत्यांना शुभेच्या दिल्या.
   शाळेच्या या स्पर्धा यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या स्पर्धेचे आयोजन करून बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.या सुंदर कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन आदर्श शिक्षक तन्वीर पठाण सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार शिवलिंग क्षीरसागर सरांनी मानले.