Monday, 14 April 2025

महात्मा ज्योतिबा फुले जयंती 2025

 *विनायक प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी*

 दि- ११ एप्रिल ( बीड रिपोर्टर) शहरातील विनायक प्राथमिक शाळेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे श्री. देवमाने सर ,श्री.उत्तरेश्वर भारती सर यांच्या शुभहस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यांचा आढावा श्री. अशोक काशीद सरांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केला.विविध विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.अनिष्ठ रूढी परंपरेला न जुमानता क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी,स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा ज्योतिबा फुले अजरामर होऊन गेले असे मौलिक विचार प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक श्री. देवमाने सर यांनी व्यक्त केले. शाळेतील शिक्षिका सौ. संजीवनी पवळ मॅडम, मनीषा चौधरी मॅडम, शैलजा बावस्कर मॅडम ,शारदा बहिरमल मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंच्या जीवनातील कार्य याबद्दल मार्गदर्शन केले.स्त्री यांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी, अनिष्ठ चालीरीती, समाजप्रबोधन, सामाजिक असमतोल नसावा, सर्व धर्म समभाव अशा विचारांची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले एक असामान्य विचारवंत, समाजसुधारक होऊन गेले. चूल आणि मूल या चौकटीत स्त्रियांना न ठेवता तिला स्वतंत्र करण्यासाठी खुप त्रास सहन केला अशा ज्योतिबा फुलेंमुळे आज महिला शिक्षित होऊन महत्वाच्या स्थानांवर कार्य करत आहेत याचा अभिमान वाटतो असे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन व्यक्त केले. या जयंती कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती. वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.












डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2025

 *विनायक प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*


दि. १४ एप्रिल ( बीड प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे प्रणेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते, अशोक काशीद सर, शैलजा बावसकर,तन्वीर पठाण सर, उत्तरेशोर भारती सर,अनिल लेहने सर, गणेश भागडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा माहिती शाळेचे शिक्षक बाळू काळे सरांनी दिली.शाळेतील शिक्षिका प्रतिभा वाघमारे मॅडम, रिता वाघमारे मॅडम यांनी ज्ञानाचा अथांग सागर भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करून दिनदलितांचे कैवारी, न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करून अजरामर झाले अशा महामानवांच्या विचारांची आजही गरज आहे असे महत्वपूर्ण विचार व्यक्त करून अभिवादन व्यक्त केले. या जयंतीनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.







Thursday, 20 February 2025

वार्षिक स्नेहसंमेलन 27 जानेवारी २०२५


 *विनायक प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*

बीड-दि.२८ जानेवारी(बीड प्रतिनिधी)-  शहरातील पेठ बीड विभागातील विनायक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळावा कार्यक्रमाचे उद्धघाटन आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.राजा मचाले सर यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी,स्व.माजी खासदार केशरकाकूंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. आदर्श शिक्षण संस्थेचे कार्यवाहक श्री.एम.ए.राऊत सर, प्राचार्य श्री.एम.सी.जाधव सर, माजी केंद्रप्रमुख श्री.फईम सर,दैनिक मिल्लतचे संपादक श्री.उमेर सलीम अख्तर, पत्रकार इम्रान शाह,नगरसेवक विकास जोगदंड, नगरसेवक इलियास शेख,भारतीताई क्षीरसागर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.बेग सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविकामधून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला व पालकांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण,कलागुण विकसीतपूर्ण शिक्षण मिळणे महत्वाचे, आहे, चटणी भाखर खा पण आपल्या मुलांना शिकवा, मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला सहकार्य करा असे पालकांना अहवान करून अतिशय उत्साहापूर्ण विचारातुन श्री.फईम सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुणवंत विदयार्थ्यांना प्रेरणा म्हणून विनायक प्राथमिक शाळेला रोख सहा हजार रुपये सुपूर्द केले.शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून आपण शिक्षण दिले तर नक्कीच शिक्षणाचे महत्त्व लक्षात येईल,विद्यार्थी शिक्षणामध्ये शिक्षक,विदयार्थी आणि पालक हे महत्वाचे घटक आहेत असे श्री.एम.ए.राऊत सरांनी स्नेहसम्मेलनाच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. शिक्षणाबरोबर अंगी असणारे गुण खुप महत्वाचे आहेत, मुलांच्या अंगी अनेक कलागून असतात ते शोधले पाहिजे, भीतीमुळे विद्यार्थी मागे राहतात शिक्षणाबरोबर शोधक वृत्ती ठेवून विदयार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून घ्या, त्यांच्यातील आवडी निवडी काय आहेत, त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून प्रोत्साहन द्या असे डॉ.श्री.राजा मचाले सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भावना व्यक्त करत, स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षिका यांचे कौतुक केले.इयत्ता बालवाडी ते ४ थी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील मुला मुलींनी या स्नेहसम्मेलनामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणारे गुणप्रदर्शन उत्साहपूर्ण नृत्याने करून उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, विविध शैक्षणिक, सामजिक, राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांना,पालक वर्ग यांना मंत्रमुग्ध केले.आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे नृत्य मूल मुली करत होती व उपस्थितांची वाहवा मिळवत होती.देशभक्ती गीत,गणेश वंदना गीत,पारंपरिक नृत्य,शेतकरी गीत,मोबाईल दुष्परिणाम संदेश देणारे गीत,हिंदी चित्रपट,मराठी चित्रपटातील गाण्यावर मूल हुभेहुब आपल्या कलेचे चित्रण करत होती.अतिशय देखने,उत्कृष्ट असे स्नेहसंमेलन विनायक प्राथमिक शाळेमध्ये संपन्न झाले.हा स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.या स्नेहसम्मेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अशोक काशीद सर व विवेक गव्हाणे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार तन्वीर पठाण सरांनी मानले.